रत्नागिरी जिल्ह्यात ३१ सक्रिय करोनाबाधित; लसीकरणाचा १५ लाखांचा टप्पा पूर्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात आज (८ डिसेंबर) ३ नवे करोनाबाधित आढळले असून, तीन जण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ३१ आहे. दरम्यान, काल (७ डिसेंबर) झालेल्या लसीकरण सत्रांनंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या लसीकरणात १५ लाख डोसेसचा टप्पा पूर्ण झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे ३ नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १०६ आहे. आज तीन रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५८६ एवढी आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८१ आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या सर्व ३३८, तर रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ६०४पैकी ६०१ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. ३ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ४१ हजार २३४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ३१ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १६, तर लक्षणे असलेले १५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १६, तर संस्थात्मक विलगीकरणात १५ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. ६ जणांची नावे डुप्लिकेट एंट्रीमुळे कोविड पोर्टलवरून काढून टाकण्यात आली आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ७, तर डीसीएचमध्ये ८ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ७ जण ऑक्सिजनवर असून, दोन रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४८९ आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१५ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४८९).

लसीकरणाची स्थिती

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल (दि. ७ डिसेंबर) करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ८१ सत्रे झाली. त्यात २९५६ जणांनी पहिला, तर ७००० जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण ९९५६ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ७५ हजार ३३२ जणांचा पहिला, तर ५ लाख २५ हजार १३४ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १५ लाख ४६६ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply