रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१५ डिसेंबर) नवे ७ करोनाबाधित आढळले, तर सहा रुग्ण बरा होऊन घरी गेले.
रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १२४ झाली आहे. आज सहा रुग्ण करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ६११ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८२ आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेले नमुने – ६२७, त्यातील ६२३ निगेटिव्ह, ४ पॉझिटिव्ह, रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेले नमुने ४४८, त्यातील ४४५ निगेटिव्ह, ३ पॉझिटिव्ह. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ४८ हजार ३०५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या २४ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ७, तर लक्षणे असलेले १७ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ७, तर संस्थात्मक विलगीकरणात १७ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ८, तर डीसीएचमध्ये ९ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ५ जण ऑक्सिजनवर असून, दोन रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४८९ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१५ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२९, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४८९).
लसीकरणाची स्थिती
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल (दि. १४ डिसेंबर) झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरण सत्रात २१५५ जणांनी पहिला, तर ९६३४ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण ११,७८९ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील ९ लाख ९० हजार २३१ जणांचा पहिला, तर ५ लाख ७० हजार ६२१ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १५ लाख ६० हजार ८५२ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media