२ महाराष्ट्र नेव्हल युनिटच्या सागरी नौका मोहिमेचे काळबादेवीत स्वागत

रत्नागिरी : येथील २ महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी. युनिटची दहा दिवसांची कोकण कोविड वॉरिअर सागरी नौका मोहीम काळबादेवी येथे समाप्त झाली. यावेळी सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेचे शानदार स्वागत केले.

कोकणच्या सागर किनाऱ्यावर दहा दिवसांची ही मोहीम राबविण्यात आली. गेल्या २० डिसेंबर रोजी सुरू झाली. तिचा समारोप काळबादेवीतील पीर दर्गा येथे झाला. या सागरी नौका मोहिमेत सहभागी असलेले २ महाराष्ट्र नेव्हल युनिटचे कमांडिंग ऑफिसर लेफ्ट. कमांडर एम. एम, सईद यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्टाफ आणि एनसीसीचे विद्यार्थी यांचे बसणी प्रशालेचे विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, आबालवृद्ध ग्रामस्थ यांनी जोरदार स्वागत केले. उत्स्फूर्त घोषणा देत सहभागी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.

तेथून मोहीम काळबादेवीचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि देवी कालिका मंदिरात पोहोचली. कालिका मंदिरात संगणकीय पीपीटीच्या माध्यमातून बापू गवाणकर यांनी काळबादेवी गावाचा भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि पर्यटनदृष्ट्या आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेतला. मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था सौ. नंदिनी शेट्ये यांच्या साईराज सहाय्यता महिला बचत गटाने केली. कोकण कोविड वॉरिअर सागरी नौका जनजागृती मोहिमेच्या आयोजनात प्रसाद तथा बापू गवाणकर, एसएमआय श्री. जाधव, प्रकाश शेट्ये, सुनील मयेकर, गजाभाई जोशी, समीर शेट्ये, भोसले साहेब, अशोक बिर्जे, सौ. प्राची मयेकर, संजय वारेकर, मुकेश शेट्ये यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply