रत्नागिरीत २०९ नवे करोनाबाधित; १३४ करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. १३ जानेवारी) करोनाचे नवे २०९ रुग्ण आढळले, तर १३४ रुग्ण करोनामुक्त झाले. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या म्हणजेच एकूण सक्रिय करोनाबाधितांची संख्या ८८९ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ८० हजार ५६६ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७७ हजार १५४ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी आणखी घटून ९५.७६ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ९८८ पैकी ९०९ निगेटिव्ह, तर ७९ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या १२६५ पैकी ११३५ नमुने निगेटिव्ह, १३० पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ७६ हजार ९७४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ८८९ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ७१८, तर लक्षणे असलेले १७१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ७०७, तर संस्थात्मक विलगीकरणात १८२ जण आहेत. ३१ रुग्णांची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ६३, तर डीसीएचमध्ये ९८ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये ११ रुग्ण आहेत. बाधितांपैकी १० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण दाखल नाही.

आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९२ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४८०, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३०, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९२).

लसीकरणाची स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात १२ जानेवारी रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची १३३ सत्रं पार पडली. त्यात २३२४ जणांनी लशीचा पहिला, तर ७४४५ जणांनी दुसरा डोस घेतला. १२ जानेवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ३४ हजार ३४७ जणांचा पहिला, तर ७ लाख ५७ हजार २३१ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत.

जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील ४००५ जणांनी १२ जानेवारीला लशीचा पहिला डोस घेतला असून, ६३२ जणांनी लशीचा बूस्टर अर्थात तिसरा डोस घेतला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply