person holding syringe

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे नवे २ रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ८ मार्च) करोनाचे दोन नवे रुग्ण आढळले. आज एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४५३ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ९०८ म्हणजे ९६.९९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या २५५ नमुन्यांपैकी २५३ निगेटिव्ह, तर २ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेले सर्व ३६७ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख २९ हजार ११४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ११ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ६, तर लक्षणे असलेले ५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणात ६, तर संस्थात्मक विलगीकरणात ५ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिली नाही.

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये आणि सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. डीसीएचमध्ये ५ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ऑक्सिजनवर एकही रुग्ण नाही, तसेच अतिदक्षता विभागातही एकही रुग्ण नाही.

आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).

जिल्ह्यातील लसीकरण

रत्नागिरी जिल्ह्यात ६ मार्च रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाचे एकच सत्र पार पडले. त्यात एका नागरिकाने लशीचा पहिला, तर ९ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण १० जणांचे लसीकरण ६ मार्च रोजी झाले. ६ मार्चपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५२ हजार ५७५ जणांचा पहिला, तर ८ लाख ६३ हजार ६६५ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण २० लाख ११ हजार ७०१ जणांचे लसीकरण झाले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply