कट्यार काळजात घुसली – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (१९ मार्च २०२२) – कट्यार काळजात घुसली
सादरकर्ती संस्था – ओंकार थिएटर्स, पेडणे, गोवा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे रत्नागिरीत साठावी संगीत राज्य नाट्य स्पर्धा १० मार्च ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. हौशी रंगभूमीवरील संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या नाट्य कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरते. या वर्षी स्पर्धेत महाराष्ट्राच्या आणि गोव्याच्या एकूण सोळा संघांनी प्रवेश घेतला आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेतील नाट्यप्रयोग सुरू होईल. (स्पर्धेचे प्रयोगपंचांग शेवटी दिले आहे.)

आज १९ मार्च २०२२ रोजी कट्यार काळजात घुसली हे नाटक ओंकार थिएटर्स, पेडणे, गोवा या संस्थेने सादर केले.

पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेले ‘कट्यार काळजात घुसली’ हे २४ डिसेंबर १९६७ रोजी रंगभूमीवर आलेले नाटक सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक लोकप्रियता लाभलेले नाटक आहे. त्यातील नाट्यपदांना पं. जितेंद्र अभिषेकीबुवांनी दिलेल्या एकाहून एक उत्तम चाली लाजवाब ठरल्या. संगीताच्या दोन घराण्यांमधील संघर्ष ही या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे. पंडित भानुशंकर यांची सत्त्वशील, आध्यात्मिक परिमाण लाभलेली ज्ञानयोग्याची गायकी आणि स्वररंजनाच्या विलासी मस्तीत रंगलेली तरीही बारीक बारीक लयकारीच्या सुखद क्षणांची पखरण केलेली खाँसाहेब आफताब हुसेन यांची गायकी अशा दोन गायकींच्या मध्ये सापडलेला ज्ञानासक्त सदाशिव. पराभवानंतर परागंदा झालेल्या पं. भानुशंकर यांचा शिष्य सदाशिव गाणे शिकवण्यास नकार देणाऱ्या खाँसाहेबांचे गाणे चोरून चोरून ऐकतो आणि आत्मसात करत जातो. हे त्याचे बिंग उघडकीस आल्यावर खाँसाहेबांचा राग अनावर होतो आणि राजगायक म्हणून मिळालेल्या कट्यारीच्या विशेष अधिकाराचा उपयोग करून सदाशिवला मारण्याचा पवित्रा घेतात. या प्रवृत्ती संघर्षाच्या चरमसीमेवर हे नाटक पोहोचते.

मुंबईत गिरगाव येथील साहित्य संघाच्या नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडला. त्यानंतर अनेक नाट्यसंस्थांनी या नाटकाचे प्रयोग केले.

पेडणे ( गोवा) येथील ओंकार थिएटर्स या संस्थेने संगीत राज्य नाट्य स्पर्धेत हे नाटक सादर केले.

श्रेयनामावली :
लेखक : पुरुषोत्तम दारव्हेकर
दिग्दर्शक : अनिल मनोहर आसोलकर
निर्माता : सखाराम परब
सूत्रधार : अभय सावंत
ऑर्गनसाथ : दत्तराज सुर्लकर
तबलासाथ : रोहिदास परब
प्रकाशयोजना : गौरव बर्वे
पार्श्वसंगीत : गणेश गोगटे
रंगभूषा : जितेंद्र परब
वेशभूषा : प्रवीण म्हामल

भूमिका आणि कलावंत :
पं. भानुशंकर : रामनाथ नाईक
सदाशिव : पांडुरंग गावडे
दिवाणजी : नंदादीपक गावडे
बद्रीप्रसाद : भिवा सावंत
झरीना : सौ. निवेदिता चंद्रोजी
खाँसाहेब : पांडुरंग नाईक
कविराज : अॅड. अमित सावंत
चाँद : पराग पार्सेकर
उस्मान : गौरव शेटगावकर
उमा : सौ. स्वरप्रिया बेहेरे
छोटा सदाशिव : स्वरेश सुनील परब

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply