पेशवाई माघी गणेशोत्सवानिमित्त जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : येथील मारुती आळीतील श्रीमंत पेशवाई माघी गणेशोत्सव आणि श्री हनुमान मित्र मंडळातर्फे जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्‍त विद्यमाने ही स्पर्धा श्री राधाकृष्ण मंदिरात येत्या २८ आणि २९ जानेवारीला होणार आहे.

या स्पर्धेत ब्रेक टू फिनिश व ब्लॅक टू फिनिश नोंदविणाऱ्या खेळाडूंना प्रथम फेरीपासून खास रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी, किशोर गट, किशोरी गट, कुमार गट आणि कुमारी गट अशा ६ गटांत खेळविली जाणार आहे. स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन (राष्ट्रीय संघटना) आणि अंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार होईल. या क्रीडा वर्षातील ही पाचवी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा असून खेळाडूंनी २०२२–२३ या वर्षाचे ५० रुपयांचे नोंदणी शुल्क जिल्हा असोसिएशनकडे जमा करावे. स्पर्धेसाठी प्रवेश फी एकेरी गटासाठी प्रत्येकी १५० रुपये राहील. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणुन राज्यस्तरीय कॅरम पंच मंदार दळवी आणि सागर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका येत्या २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच स्पर्धा शुल्कासहित खालील ठिकाणी द्यावयाच्या आहेत. त्यानंतर आलेल्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही. स्पर्धेत सामना खेळणासाठी पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट खेळाडुने परिधान करणे आवश्यक आहे.

प्रवेश अर्जासाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा – गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), चिपळूण – साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), देवरूख – मोहन हजारे (९४२२०५३९४३), रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), खेड – योगेश आपटे (९९५३२२२६३९१).

स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगेश संसारे आणि रत्नागिरी जिल्हा कॅरस असोसिएशनतर्फे अध्यक्ष प्रदीप भाटकर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply