संगीत सूरसाधक – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

आजचे नाटक (२८ जानेवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता)

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत सूरसाधक हे नाटक श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ (केरी, फोंडा, गोवा) ही संस्था सादर करणार आहे.

सादर करणारी संस्था : श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ, केरी, फोंडा, गोवा

संगीत “सूरसाधक” हे संदीप मणेरीकर लिखित बैजू मिश्र अर्थात बैजू बावरा यांच्या जीवनावर बेतलेले नाटक.
हे नवे कोरे नाटक स्पर्धेसाठी खास लिहिलेले आहे. जुने किंवा अस्तित्वात असलेल नाटक हे प्रक्रियेतून आलेले असते. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून तसे मुळापासून काम करण्याची गरज भासत नाही, परंतु नवीन संहिता असली की संवाद, दृश्य, आलेख, तांत्रिक बाजू, आशय विषय असा सगळीकडे मुक्त संचार करता येतो. गरजेप्रमाणे संहितेत लेखकाकडून बदल किंवा संकलन करून घेता येते. संगीत सूरसाधक हे खूप छान आणि स्वतंत्र संकल्पनेतून साकारले गेलेले नाटक आहे. संदीप मणेरीकर यांनी खूप छान तर्‍हेने नाटकाची एकंदरीतच मांडणी केली आहे. प्रामुख्याने वाचिक अभिनयातून नाटक प्रभावीपणे उतरले गेलेले आहे, रंगतदार झालेले आहे. नवीन नाट्यपदांची निर्मितीदेखील सृजनशीलतेला पैलू पाडत असते, नाटक नवीन, पदे नवीन, त्यामुळे हुरूप नवीन. गौरीश तळवलकर यांनी या नाटकाची संगीताची बाजू उत्तमरीत्या सांभाळली आहे. नाटकातील पदे शास्त्रीय संगीतावर आधारित असल्याने गायक कलाकारांचा कस लागतो.

बर्‍याच जणांना बैजू, आणि तानसेन यांच्यामध्ये झालेली स्पर्धा माहीत आहे. परंतु त्यातील काही कथानक अनभिज्ञ असते. या नाटकात नेमका त्याच विषयावर अभ्यास करून प्रकाशझोत टाकलेला आहे. त्यामुळे नाटक नावीन्यपूर्ण ठरते. नाटकात वृत्ती आणि प्रवृत्ती प्रभावीपणे सामोऱ्या येतात. स्वार्थामधून आलेला मीपणा, माज आणि शेवटाला होणारा रसभंग एका तत्त्वाकडे लक्ष वेधून घेतो. ते तत्त्व् म्हणजे कला ही स्वामिनी असते. ती दासी किंवा कोणाची रखेल होऊ शकत नाही.

ही राज्य संगीत नाट्य स्पर्धा १८ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. यावर्षी प्रथमच ही स्पर्धा वातानुकूलित नाट्यगृहात होणार आहे.

आजचे नाटक (२५ जानेवारी २०२३) संगीत सौभद्र

लेखक : संदीप मणेरीकर
दिग्दर्शन : नितीन कोलवेकर
संगीत दिग्दर्शन : गौरीश तळवलकर
ऑर्गनसाथ : प्रसाद नाईक
तबला : हृषिकेश फडके
पार्श्वसंगीत : विनय बोरकर
रंगभूषा : एकनाथ नाईक
प्रकाशयोजना : गोरक्षनाथ राणे
वेशभूषा : मंगला जांभळे
नेपथ्य : नितीन कोलवेकर
निर्मिती प्रमुख : मंगला जांभळे
सूत्रधार : अपर्णा मणेरीकर

भूमिका आणि कलावंत
बैजू : गौरीश तळवलकर
गौरी : मनाली पार्सेकर
छोटा गोपाळ : चि. संचित मणेरीकर
अकबर : नितीन कोलवेकर
बिरबल : ब्रह्मानंद धारगळकर
तानसेन : पांडुरंग शिरोडकर
व्यापारी : संदीप मणेरीकर
मोठा गोपाळ : शिवम रायकर
काश्मीर नरेश : प्रकाश बेहेरे
महामंत्री : उमेश गावणेकर
शिपाई : मितेश पार्सेकर, मंदार मणेरीकर, गोपाळ गावकर, विनोद नाईक

स्पर्धेचे प्रयोगपंचांग

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply