अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र
आजचे नाटक (२९ जानेवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता)
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत आज २९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत मत्स्यगंधा हे नाटक नागपूरचे स्वानंद सांस्कृतिक मंडळ सादर करणार आहे.
सादर करणारी संस्था :
स्वानंद सांस्कृतिक मंडळ, नागपूर
जलालपुरा, पोलीस चौकी, गवळीपुरा, महाल, नागपूर
कै. प्रा. वसंतराव कानेटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने संगीत मत्स्यगंधा हे नाटक स्वानंद सांस्कृतिक मंडळ (नागपूर) सादर करत आहे. त्यासोबतच संगीत दिग्दर्शक जितेंद्र अभिषेकी आणि गायक नट रामदास कामत यांनाही त्यानिमित्ताने आदरांजली वाहता यावी, हाही उद्देश आहे. गेली वीस वर्षे नागपूरच्या रंगभूमीवर संगीत नाटक झाले नव्हते. संगीत रंगभूमी जागती ठेवता यावी, यासाठी रौप्यमहोत्सवी स्वानंद सांस्कृतिक मंडळाने पुढाकार घेतला आणि भावी पिढीमध्ये संगीत नाटकाची ज्योत तेवती राहावी, यासाठी हा प्रयत्न संस्थेने आणि दिग्दर्शक प्रभाकरराव ठेंगडी यांनी केला आहे.
आजचे नाटक (२ जानेवारी २०२३) संगीत सौभद्र
लेखक : प्रा. वसंत कानेटकर
दिग्दर्शक : प्रभाकर ठेंगडी
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
निर्मितीप्रमुख : मोहन नहातकर
नेपथ्य : रोशन नंदवंशी
रंगभूषा : लालजी श्रीवास
रंगमंच व्यवस्था : धीरज अढाऊ, मनीष चौधरी
प्रकाशयोजना : ऋषभ दापोडकर
वेशभूषा : कुणाल नावले
पार्श्वसंगीत : अमित कुबडे
संवादिनी : प्रशांत उपगेड
तबला : प्रमोद बावणे
भूमिका आणि कलावंत
भीष्म : विनोद तुंबडे
शंतनु : मनीष मोहरील
धीवर : मंगेश बावसे
चंडोल : मुकुंद वसुले
प्रियदर्शन : मोहन काळबांडे
अंबा : रोहिणी मोहरील
सत्यवती : यामिनी पायधन
पराशर : गुणवंत घटवाई
नगरवासी :
राहुल ठेंगडी, रोशनी सेलूकर, अमोल निबाळते, दीपक कट्यारमल
सादर झालेल्या नाटकातील काही दृश्ये











स्पर्धेचे प्रयोगपंचांग


