संगीत तमसो मा ज्योतिर्गमय – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

नाटक दि. १० फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १० फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत “तमसो मा ज्योतिर्गमय” हे नाटक दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा संस्थेने सादर केले.

सादर करणारी संस्था :

दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा, दापोली, जि. रत्नागिरी

दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धिनी सभा या संस्थेचे “तमसो मा ज्योतिर्गमय” हे नवे संगीत नाटक आहे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या काळात संपूर्ण भारतभर हजारो निष्ठावंत स्त्रीपुरुष शिष्य निर्माण केले. त्यापैकीच एक म्हणजे हभप वेण्णास्वामी या त्यांच्या पट्टशिष्या होत्या.

त्याकाळी बालविधवा स्त्रियांचे जगणे खूप कठीण होते. समर्थांनी अशा स्त्रियांना आधार दिला आणि परमार्थ शिकविला. ताठ मानेने समाजापुढे उभे राहायचे सामर्थ्य दिले. संत वेण्णास्वामीही त्यापैकीच एक होत्या. रामाची कठोर उपासना आणि सद्गुरूविषयी असलेली निष्ठा पाहून स्वामींनी त्यांच्यावर कृपादृष्टी केली. त्यांच्या उपलब्ध असलेल्या अत्यल्प चरित्रावर आधारित हे नाटक असून त्याला काही बाधा येणार नाही याची काळजी घेऊन हे नाटक अधिक रंजक व्हावे, यासाठी थोडीफार काल्पनिक जोड दिली आहे. काहीसे अपरिचित असलेले वेण्णास्वामींचे चरित्र जनसामान्यांपुढे यावे, या उद्देशाने हे नाटक स्पर्धेच्या निमित्ताने साकारले आहे.

श्रेयनामावली
लेखक-दिग्दर्शक : विलास भालचंद्र कर्वे
संगीत दिग्दर्शक : निळकंठ श्रीकांत गोखले
ऑर्गन : आनंद प्रकाश वैशंपायन
तबला : चैतन्य सुहास गोडबोले
मृदुंग, तालवाद्य : नागेश रवींद्र किरडावकर
पार्श्वसंगीत, ध्वनिमद्रण, संकलन : नितीन नामदेव बागडे
नेपथ्य : पूर्णानंद प्रमोद मेहेंदळे
प्रकाशयोजना : अनंत तुकाराम साळवी
वेशभूषा : वीणा अमेय कर्वे
रंगभूषा : रामनाथ राजन आवले
रंगमंच व्यवस्था : प्रसाद जयराम फाटक
कला : कु. अदिती प्रकाश वैशंपायन

भूमिका आणि कलावंत
आकृती मंदार केळकर : लहान वेण्णा
डॉ. वैभव सदानंद लिमये : गोपाजीपंत
सौ. जान्हवी विनोद गोविलकर : राधिकाबाई
प्रभाकर महेश्वर वैशंपायन : गाडीवान
विनायक नारायण बाळ : नाना देशपांडे
सौ. सुप्रिया सुनील रिसबूड : माई देशपांडे
गौरी शशिकांत खरे : मोठी वेण्णा
अभिषेक रमेश जोशी : रामदास स्वामी
सौ. पूजा प्रसाद लागू : शर्वरी
डॉ. प्रमोद विनायक जोशी : सदा
जगन्नाथ विद्याधर जोशी : उद्धव स्वामी
अक्षता अविनाश जोशी : आक्काबाई
आर्या वैभव लिमये : अंबिकाताई
मिलिंद यशवंत कर्वे : हरीबाबा
डॉ. सानिका संजय जोशी : रामाई
राजेंद्र महेश्वर वैशंपायन, आदित्य राजेंद्र रिसबूड, वेदांग मंगेश शितूत, पार्थ चिंतामणी पटवर्धन, अमेय श्रीनिवास आखवे : सहायक

संगीत तमसो मा ज्योतिर्गमय नाटकातील क्षणचित्रे

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply