संगीत कट्यार काळजात घुसली – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

नाटक दि. १३ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत कट्यार काळजात घुसली हे नाटक रत्नागिरीतील आर्ट सर्कल संस्था सादर करणार आहे.

सादर करणारी संस्था :

आर्ट सर्कल, रत्नागिरी

कट्यार काळजात घुसली हे १९६० च्या दशकात निर्माण झालेले नाटक म्हणजे संगीत नाट्य रंगमंचाची एक अजरामर कलाकृती आहे. गायकीच्या दोन घराण्यांमधील तफावत हा या नाटकाचा मुख्य विषय. या विषयाच्या अनुषंगाने मानवी वृत्ती नाटकभर ठळक होत जातात. यामधील खाँसाहेब स्वतःच्या घराण्याच्या गायकीशी दुराग्रही आहेत आणि त्या दुराग्रहापोटी सदाशिव नावाच्या उमद्या आणि गुणी तरुणाला ते विद्या देण्यास नकार देतात. पदवी, पैसे, प्रतिष्ठा यापेक्षा घराण्याची गायकी प्राणपणाने जपणे हे त्यांना त्यांचे कर्तव्य वाटत असते. सन्मान म्हणून मिळालेल्या कट्यारीचा उपयोग याच कर्तव्याच्या दुराग्रहापोटी खाँसाहेबांकडून होतो. पण अखेर सदाशिवाच्या सुरांचीच कट्यार खाँसाहेबंना घायाळ करून जाते.

प्रत्येक भूमिकेला असंख्य छटा आणि गायकीच्या दोन घराण्यांची श्रीमंत संगीत मिळालेली गाणी हे नाटकाचे वैशिष्ट्य होय. तगडी संहिता आणि अमर संगीत यामुळे प्रत्येक पिढीतल्या कलाकारांना कट्यार नाटक करावेसे वाटत राहते. पेलावेसे वाटत राहते. आर्ट सर्कलने यावेळी ते नाटक पेलायचा विचार केला आहे.

श्रेयनामावली
लेखक : पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत दिग्दर्शक : पं. जितेंद्र अभिषेकी
दिग्दर्शक : दीप्ती कुवळेकर-कानविंदे
ऑर्गन : वरद सोहनी
तबला : केदार लिंगायत
विशेष साह्य : सौरभ हर्षे, विलास हर्षे
नेपथ्य : प्रशांत साखळकर
रंगभूषा : रामदास मोरे
प्रकाशयोजना संकल्पना : साई शिर्सेकर
साह्य : जयतीर्थ राऊळ, यश पूजा शंकर
पार्श्वसंगीत : राधिका भिडे
साह्य : अनिकेत आपटे

भूमिका आणि कलावंत
उमा : अनुराधा गोखले
दिवाणसाहेब : भाग्येश खरे
बाँके बिहारी : स्वानंद देसाई
चांद : यश सोवनी
उस्मान : आदित्य लिमये
बद्रीप्रसाद : पुष्कर सरपोतदार
झरीना : करुणा पटवर्धन
खाँसाहेब आफताब हुसेन : कैलास खरे
पंडित भानुशंकर : आनंद पाटणकर
छोटा सदाशिव : ऋग्वेद तेरेदेसाई

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply