कीर्तनसंध्या परिवारातर्फे ई-चाचणी प्रश्नमंजूषा

रत्नागिरी : येत्या ३० मार्च रोजी (चैत्र शुक्ल नवमी) म्हणजेच रामनवमी असून त्याचे औचित्य साधून रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवारातर्फे श्रीरामाच्या जीवनावर आधारित ई-चाचणी प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली आहे.

प्रभू श्रीरामचंद्राच्या जीवनाची अधिक माहिती रामनवमीच्या निमित्ताने व्हावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. रामायण ही रघुवंशातील प्रभू श्रीरामचंद्रांची कथा आहे. आदिकवी वाल्मीकींनी लिहिलेल्या अद्वितीय संस्कृत महाकाव्याचा हा स्मृती भाग आहे. त्या रामायणकथेशी संबंधित काही महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न या प्रश्नावलीमध्ये आहेत. ज्ञानात भर पडावी म्हणून काही सामान्यज्ञान प्रश्नही ई-चाचणीद्वारे विचारले जातील.

त्याकरिता एक लिंक तयार करण्यात आली आहे. त्यावर जाऊन त्यात विचारलेली आवश्यक माहिती भरून कोणालाही या परीक्षेत सहभागी होता येईल. ही परीक्षा पूर्णपणे मोफत असेल. ई-चाचणीमध्ये दिलेले प्रश्न सोडवून सबमिट केल्यानंतर लगेचच मिळालेले गुण दिसतील. सोडविलेला पेपरसुद्धा दिसेल. उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सहभाग प्रमाणपत्रदेखील मिळणार आहे. त्याची लिंकदेखील त्याच मेसेजमध्ये दिली जाणार आहे. तेथून ते प्रमाणपत्र ३० एप्रिलनंतर डाऊनलोड करता येईल. त्यात सहभागी होणाऱ्याचे नाव आणि मिळालेले गुण दिसणार आहेत.

या चाचणीत सहभागी होण्यासाठी लिंक – https://forms.gle/dRdwBzjgvfZ66EdX9

सोबतच्या क्यूआर कोडवरूनही चाचणीमध्ये सहभागी होता येईल.

ही चाचणी ३० मार्च ते २८ एप्रिल पर्यंत सोडविता येईल. त्यानंतर १ मे रोजी https://we.tl/t-8L1yB9BpxN या लिंकवर जाऊन प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.

कीर्तनसंध्या परिवाराने आयोजित केलेल्या या ई-चाचणी उपक्रमात अधिकाधिक सहभाग नोंदवावा. उपक्रमात सहभागी होणाऱ्यांनी इतरांनाही या उपक्रमाबाबत सांगून त्यांनाही सहभागी व्हायला सांगावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply