रत्नागिरी : वर्षभर धावपळ व लेखापरीक्षण, ऑनलाइन काम, जीएसटी यासह अनेक कामात व्यस्त असलेल्या सीए, करसल्लागार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा महोत्सव हा एक आनंदाचा क्षण असतो. यातून सर्वांना भरपूर आनंद मिळतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे यांनी केले.नी ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि ज्ञान द्यावे, असे आवाहन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सचे अध्यक्ष एम. श्रीनिवास राव यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा करसल्लागार असोसिएशन आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे सीए, करसल्लागार व कर्मचाऱ्यांचा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याची सांगता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर झाली. त्यावेळी ते बोलत होते. वर्षभर धावपळ व लेखापरीक्षण, ऑनलाइन काम, जीएसटी यासह अनेक कामात व्यस्त असलेल्या सीए, करसल्लागार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. तन व मन यांचा संयोग म्हणजे आनंद. महोत्सवात सर्वांनी स्पर्धांमध्ये भाग घेऊन आनंद लुटलात याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरदराज पंडित, एंजल ब्रोकिंगचे प्रतिनिधी, करसल्लागार राजेश सोहनी, सीए इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये उपस्थित होत्या.
स्पर्धेतील विजेत्यांना पदक देऊन गौरवण्यात आले. क्रिकेट स्पर्धेत चांगल्या कामगिरीबद्दल रोख बक्षिसेही देण्यात आली. स्पर्धेकरिता एंजल ब्रोकिंगचे सहकार्य लाभले. याबद्दल प्रतिनिधी राजेश सोहनी यांचे विशेष आभार मानण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी करसल्लागार असोसिएशनचे पदाधिकारी, सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे पदाधिकारी, स्पर्धा कमिटीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
स्पर्धांचा निकाल असा – बुद्धिबळ- विजयी वरद पेठे, उपविजयी- वल्लभ महाबळ, कॅरम एकेरी- अतुल पंडित, सीए मीनल काळे, कॅरम दुहेरी- अक्षय प्रभुदेसाई व अतुल पंडित, ओम काळोखे व निशांत अभ्यंकर, बॅडमिंटन पुरुष दुहेरी- विजयी केतन रहाटे व वरद पटवर्धन, उपविजयी- राजेश सोहनी, राजेश गांगण. महिला- रेणू जोशी व सीमा दसाणा, मोनिका कोलबकर व नेहा वळंजू, बॅडमिंटन (सदस्यांकरिता) एकेरी- सीए वरद पटवर्धन, राजेश सोहनी. बॅडमिंटन (विद्यार्थ्यांकरिता)- हर्षद पटवर्धन, तन्मय मराठे. महिला एकेरी- रोशनी देसाई, सांची डांगे. क्रिकेट विजयी संघ- एसएस ११, उपविजयी- क्रेझी फोर्स. अंतिम सामन्यातील सामनावीर व सर्वोत्कृष्ट गोलंदाज- भूषण पाटणकर, मालिकावीर – अनिष गांगण, सर्वोत्कृष्ट फलंदाज- अमर नेवरेकर, साखळी सामन्यातील सामनावीर- आतिश थुळ, सर्वेश पाटील, अक्षय प्रभुदेसाई, केतन रहाटे, अनिष गांगण, अमर नेवरेकर.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

