पितांबरी प्रॉडक्ट्सच्या जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला प्रतिसाद

देवरूख : पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने येथे आयोजित केलेल्या जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.

रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा देवरूख येथील चितामणी मंगल कार्यालयात पार पडली. स्पर्धेच्या उद्घाटनाला पितांबरीचे मॅनेजर श्रीहरी शौचे, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सदस्य विनय गांगण, प्राजक्ता देसाई, स्पर्धा प्रमुख मोहन हजारे, राज्यस्तरीय पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी आणि बहुसंखेने खेळाडू उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल असा – पुरुष एकेरी अंतिम फेरी – अभिषेक चव्हाण विजेता विरुद्ध राहुल भस्मे २० – १०, २५ – १०.
उपान्त्य फेरी १ – अभिषेक चव्हाण विजेता विरुद्ध अभिजित खेडेकर २५ – ११, २५ – ००
उपान्त्य फेरी २ – राहुल भस्मे विजेता विरूद्ध योगेश कोंडविलकर २५ – १३, २१ – १६

पुरुष दुहेरी अंतिम फेरी – अभिषेक चव्हाण / दत्ताराम वासावे विजेता विरुद्ध सौरभ महाकाळ / दिनेश पारकर २५ – ००, ११ -०८
उपान्त्य फेरी १ – अभिषेक चव्हाण /दत्ताराम वासावे विजेता विरुद्ध ओम पारकर / निलेश निवळकर ११ – १२, १२ – ०६, १८ – ००.
उपान्त्य फेरी २ – सौरभ महाकाळ / दिनेश पारकर विजेता विरुद्ध राहुल कदम / राजेंद्र कदम ०६ – ०२, २१ – ००

कुमार गट अंतिम फेरी – ओम पारकर विजेता विरुद्ध द्रोण हजारे १४ – ००, ०८ – १६, १० – ०४

किशोर गट अंतिम फेरी – स्मित कदम विजेता विरुद्ध सर्वेश आमरे १५ – ०४, ०९-०५

किशोरी गट अंतिम फेरी – स्वरा कदम विजेता विरुद्ध स्वरा मोहिरे १० – ०५, १० – ०९

स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद साप्ते, जुने मानांकित खेळाडू दिलीप विंचू, पितांबरी प्रॉडक्ट्सचे विक्रेते वैभव साने, स्पर्धा प्रमुख मोहन हजारे, कॅरम राज्यस्तरीय पंच मंदार दळवी, सागर कुलकर्णी व बहुसंखेने खेळाडू उपस्थित होते. स्पर्धेतील काही सामन्याचे थेट प्रक्षेपण रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनतर्फे पहिलांद्याच यूट्यूबवर करण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply