रत्नागिरीत रविवारी आषाढीनिमित्त अभंगवाणी

रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त अभंगवाणी हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.

हा कार्यक्रम रविवारी, दि. ६ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चित्पावन ब्राह्मण संघाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे.
कार्यक्रमाचे हे सलग अकरावे वर्ष आहे. मूळची रत्नागिरीची परंतु सध्या मुंबईत वास्तव्यास असलेली प्रेरणा दामले – वझे आणि दापोलीतील अभिषेक जोशी यांच्या भक्तिसंगीत गायनाने अभंगवाणी हा कार्यक्रम रंगणार आहे.

प्रेरणा दामले

प्रेरणा दामले-वझे या एम कॉम तसेच संगीत विशारद आहेत. रत्नागिरीतील प्रसिद्ध गायिका व गुरू सौ. मुग्धा भट – सामंत यांच्याकडे त्यांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण झाले आहे. खल्वायन संस्थेच्या संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण करून त्यांनी सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट गायिका अभिनेत्री म्हणून राज्य नाट्य स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. पश्चिम रेल्वेमध्ये नोकरी करीत असलेल्या प्रेरणा दामले आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार, माणिक वर्मा पुरस्काराने त्या सन्मानित आहेत.

अभिषेक जोशी

कार्यक्रमातील दुसरे कलाकार अभिषेक जोशी दापोलीतील प्रसिद्ध गायक कलाकार आहेत. १९९७ पासून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिक्षण घेण्यास त्यांनी सुरुवात केली. सुरवातीला पंडित नारायण महादेव केळकर गुरुजी (ग्वाल्हेर घराणे) यांच्याकडे शिक्षण झाले. त्यानंतर मुंबईत पंडित नारायण बोडस यांच्याकडे शिक्षण झाले. २००२ अणि २००३ मध्ये मुंबई विद्यापीठात आंतरमहाविद्यालय स्पर्धेत सलग २ वर्षे त्यांचा सहभाग होता. त्यांचे संगीत विशारदचे शिक्षण २००५ मध्ये, तर २००७ ला संगीत अलंकार चे शिक्षण पूर्ण झाले. २०१५ मध्ये त्यांनी संगीत सौभद्र नाटकात कृष्णाची भूमिका साकारली. त्यात राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला. २०१८ मध्ये अभिजित दळवी लिखित अणि प्रमोद शेलार दिग्दर्शित भेटी लागी जिवा नाटकाच्या व्यावसायिक प्रयोगात त्यांनी काम केले. सन २०२२ ला music therapist ही पदवी त्यांनी प्राप्त केली. २०२४ मध्ये विलास कर्वे लिखित-दिग्दर्शित तम सो मा ज्योतिर्गमय नाटकात श्री समर्थ रामदास स्वामींची भूमिका त्यांनी साकारली . त्यात यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. सध्या खेडच््या रोटरी इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये ते संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

कार्यक्रमाला साथसंगत अशी असेल : ऑर्गन – निरंजन गोडबोले, तबला – केदार लिंगायत, पखवाज – कैलास दामले, तालवाद्य – सुहास सोहनी, निवेदन – निबंध कानिटकर, ध्वनिव्यवस्था – एस कुमार साऊंड सर्व्हिसेस, रत्नागिरी.

प्रवेश विनाशुल्क असून सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन चित्पावन संघ व सप्तसूर म्युझिकल्स यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply