औषधी वनस्पतींची माहिती लोकांनी घ्यावी, मुलांनी अभ्यास करावा : दधिच

रत्नागिरी : मुलांच्या विकासात पालकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या परिसरातील औषधी वनस्पतींची माहिती आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांनी करून घ्यावा आणि मुलांनी प्राचीन परंपरागत आयुर्वेदाची माहिती घेऊन अभ्यास करावा, असे आवाहन जेएसडब्ल्यूचे सीएसआर विभागप्रमुख अनिल दधिच यांनी केले.

जेएसडब्ल्यू फाउंडेशन आणि रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचा संयुक्त उपक्रम म्हणून आयोजित केलेल्या औषधी वनस्पती नोंदवही आणि पीपीटी जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला. त्यावेळी पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. याच उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी असलेली ही स्पर्धा सहावी ते आठवी, नववी-दहावी आणि अकरावी-बारावी अशा तीन गटांत झाली. स्पर्धेत १६४ जणांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये ४२ पीपीटी आणि सुमारे ११२ नोंदवह्या सादर झाल्या. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातीलही विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेतील पहिले तीन आणि उत्तेजनार्थ गुणानुक्रमे विजेते असे – औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धा : गट – १ सावनी संभाजी आंब्रे (छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर, देवरूख), आर्या नंदकुमार पाटोळे (जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे), शाल्मली प्रसाद रायंगणकर (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), पार्थ राजेश भागवत(छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर, देवरूख), जान्हवी किशोर गोखले (न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख) हर्षदा राजेश पितळे (वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय, मार्गताम्हाणे) तन्मय प्रसाद वाडकर (जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, मिरजोळे क्र. १). गट २ – श्रावणी गणेश उकिडवे (फाटक हायस्कूल, रत्नागिरी), श्रावणी प्रमोद खामकर (शिर्के प्रशाला, रत्नागिरी), दीक्षा दिलीप कळंबटे (अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर, हातखंबा), सना दीपक चौघुले माध्यमिक विद्यालय वरवडे, भागशाळा खंडाळा), मीनाक्षी मंगेश हेतगावकर (न्यू इंग्लिश स्कूल, तळसरे, दापोली) ऋतुजा उदय वाडकर (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी) सानिया रवींद्र वाडकर (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी). गट ३ – प्रणव पांडुरंग धनावडे (श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, खंडाळा), निधी किसन लोकरे (डॉ. सामंत कनिष्ठ महाविद्यालय, पावस), सिद्धी अनिष साठे (खंडाळा), सायली तुकाराम कुंभार (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा), स्वप्नाली दिलीप सावंत (अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज, रत्नागिरी), (नाथ पै विद्यालय, हर्चे), पूजा शशिकांत सोड्ये (गोडे दाते ज्युनिअर कॉलेज राजापूर).
औषधी वनस्पती नोंदवही स्पर्धा : (पीपीटी) गट १ श्रेया दिनेश राणे (रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड), तनिष्का संजय कुलकर्णी (छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर, देवरूख), रिया विपीन दहिवसे (जिंदल विद्यामंदिर, चाफेरी), आदिती संपत पाटील (शिर्के प्रशाला, रत्नागिरी), देवयानी राजेंद्र भागवत (माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज, नाणीज), शुभम संतोष कांबळे (न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख), सार्थक नितीन टेमकर (डॉ. वि. रा. घोले, वाकवली, दापोली). गट १ – मृण्मयी महेश कुलकर्णी (संतोषभाई मेहता इंग्लिश मिडियम स्कूल, दापोली), मृदुता पाटकर (बॅरिस्टर नाथ पै विद्यालय हर्चे), वरद मंगेश सरदेसाई (न्यू इंग्लिश स्कूल लांजा), मंथन अरविंद महाकाळ (जिंदल विद्यामंदिर, चाफेरी), 2आर्या सुधाकर शिर्के (जिंदल विद्यामंदिर, चाफेरी), दीक्षा भालचंद्र सागवेकर (माध्यमिक विद्यालय, वरवडे भागशाळा खंडाळा), अनुज दीपक थोरात (जिंदल विद्यामंदिर, चाफेरी), गट ३ – स्मित मंगेश संसारे (पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, खंडाळा), वैभव दत्तात्रय काटधरे (पेठे कनिष्ठ महाविद्यालय, मार्गताम्हाणे), पूजा सदानंद भाऊबडे (अभ्यंकर कुलकर्णी, रत्नागिरी), स्नेहा विठ्ठल सागवेकर (बापट कनिष्ठ महाविद्यालय, खंडाळा), हितेश प्रसादे, तन्मय राजेश खेडेकर (ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल मोरवडे बोरज).

स्पर्धेचे परीक्षण हरितसेना पुरस्कार विजेते सत्यवान कोत्रे, डॉ. प्राची वाडकर, सौ. मनाली नाईक, व्ही. व्ही. फणसे व कुसुम चव्हाण यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनाकरिता रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे यांनी मार्गदर्शन केले. जेएसडब्ल्यू फाउंडेशन आणि जेएसडब्ल्यू एनर्जी तसेच रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळातर्फे सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply