रत्नागिरीच्या ‘स्वराभिषेक’तर्फे खुली ऑनलाइन अभंग गायन स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरीतील ‘स्वराभिषेक’ संस्थेतर्फे यंदा ऑनलाइन अभंग गायन स्पर्धा आयोजित केली आहे. ती सर्व वयोगटासाठी खुली असून रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच जिल्ह्याबाहेरील स्पर्धकही त्यात सहभागी होऊ शकतील.

स्वराभिषेक-रत्नागिरी आणि प. पू. गगनगिरी महाराज आश्रमातर्फे गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृतिदिनानिमित्त संतरचित अभंग गायन स्पर्धा यावर्षी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. गेली तीन वर्षे ही स्पर्धा घेतली जात आहे. यावर्षी करोनाच्या सावटामुळे प्रत्यक्ष स्पर्धा घेणे शक्य नसल्याने अभंगांचे ऑनलाइन व्हिडीओ मागविण्यात आले आहेत. त्याकरिता स्पर्धकांनी संतरचित अभंगांचा ३ ते ५ मिनिटांचा व्हिडीओ पाठवायचा आहे. व्हिडीओमध्ये सुरवातीला अभंग सुरू करण्यापूर्वी व्हिडीओ बनवल्याची तारीख, तसेच आपले नाव, वय, गाव, अभंग व कवी संतांचे नाव सांगायचे आहे. संगीतसाथीला हार्मोनियम, तबला, पखवाज, तालवाद्य, तानपुरा यातील कोणतीही वाद्ये घेता येणार आहेत. कोणत्याही साथीशिवाय गायलेला अभंगही स्पर्धक पाठवू शकतात. अभंग स्टुडिओ रेकॉर्डिंग, एडिटिंग केलेला नसावा. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून विजेत्यांना प्रमाणपत्रासह रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. यावर्षी प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ असे विजेते मान्यवर परीक्षकांद्वारे निवडण्यात येणार असून रसिकांच्या लाईक्सवर एक विजेता निवडण्यात येणार आहे. व्हिडीओ पाठवण्याची १६ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे.

व्हिडीओ साक्षी (7498740502), ईशानी (7720009410) किंवा सिद्धी (7030553042) यांच्याकडे व्हॉटस अॅपद्वारे पाठवावेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply