रत्नागिरी, सिंधुदुर्गात करोनाबाधितांच्या संख्येत दुसऱ्या दिवशीही वाढ

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत आज (२९ जानेवारी) सलग दुसऱ्या दिवशीही वाढ झाली. रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे २७, तर सिंधुदुर्गात १९ रुग्ण आढळले. रत्नागिरीत ६ जण, तर १२ जण सिंधुदुर्गात करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एका मृत्यूची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात ५, दापोलीत २, चिपळूण तालुक्यात १२, संगमेश्वर तालुक्यात ६, तर मंडणगडमध्ये १ असे २६ नवे बाधित रुग्ण सापडले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी तालुक्यात एक नवेा बाधित रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून २७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९५४० झाली आहे. आज आणखी ९७२ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७१ हजार २९० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०७ आहे. त्यातील सर्वाधिक ३५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ४८ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज ६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९०६५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.०२ टक्के झाला आहे. लांजा तालुक्यातील एका ५५ वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३४८ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६५ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, १९ नवे करोनाबाधित आढळले, तर १२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६२२७ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५८३७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६५ आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply