रत्नागिरीत २५, सिंधुदुर्गात १२ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३१ जानेवारी) करोनाचे नवे २५ रुग्ण आढळले, तर ९ जण करोनामुक्त झाले. दोघांच्या मृत्यूची नोंद आज झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे ५ रुग्ण सापडले, १० जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी २, खेड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी १, तर चिपळूण तालुक्यात १४ नवे बाधित रुग्ण सापडले. रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरीत ४, तर लांजा तालुक्यात १ नवा रुग्ण सापडला. (दोन्ही मिळून २५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९५७२ झाली आहे. आज आणखी २६९ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७२ हजार १३४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९८ आहे. त्यातील सर्वाधिक २९ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ४९ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

जिल्ह्यात आज ९ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९०९३ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.९९ टक्के झाला आहे.

राजापूरमधील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू काल झाला होता, तर चिपळूण तालुक्यात १८ जानेवारीला मरण पावलेल्या ७४ वर्षाच्या पुरुषाची नोंद आज झाली. मृतांची एकूण संख्या आता ३५० झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६५ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, ५ नवे करोनाबाधित आढळले, तर १० जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६२४४ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५८६० झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या १६६ एवढीच आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply