रत्नागिरीत १५, सिंधुदुर्गात दहा नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ फेब्रुवारी) करोनाचे नवे १५, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० रुग्ण आढळले. रत्नागिरीत १६ जण, तर सिंधुदुर्गात ४ जण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एकाचा मृत्यू नोंदविला गेला.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १५ रुग्ण आढळले. मात्र आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार किती आणि कोणत्या तालुक्यात रुग्ण आढळले, याचा तपशील जिल्हा माहिती कार्यालयाकडून उपलब्ध झाला नाही. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९६९१ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी २७५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७४ हजार ६७८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९३ आहे. त्यातील सर्वाधिक २५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ३३ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९२२२ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.१६ टक्के झाला आहे.

एका मृत्यूची नोंद आज झाली. त्याविषयीही अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या आता ३५५ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६६ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (१२ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, १० नवे करोनाबाधित आढळले, तर ४ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३३९ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५९७५ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या १७१ आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply