रत्नागिरीत १५, सिंधुदुर्गात करोनाचे नवे १० रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (५ मार्च) करोनाचे नवे १५ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार ५६ झाली आहे. आज ५ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे १० बाधित आढळले, तर ७ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १५ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ५, गुहागर, लांजा आणि राजापूर तालुक्यात प्रत्येकी १, तर चिपळूण तालुक्यात ४ नवे बाधित आढळले. (एकूण ११) रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी, खेड आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी १ बाधित आढळला. (दोन्ही मिळून १५). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ५६ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ७९६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८३ हजार ४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३४ आहे. त्यातील सर्वाधिक ४६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ५१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ५ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९५३० झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.७६ टक्के आहे.

जिल्ह्यात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६७ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६५ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात आज (५ मार्च) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे १० करोनाबाधित आढळले, तर ७ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६४९० झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६१३८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७४ आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply