खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..
झोंपाळ्यावरची गीता – अध्याय दहावा : विभूतियोग
एकाच वृक्षाची । पानें, फुलें, फळें ।।
साली आणि मूळें । अंगें जैसीं ।।५।।
माझ्याचपासूनी । बरें कीं वाईट ।।
भाव इष्टानिष्ट । होती तैसे ।।६।।
माझ्या या विभूति । जाणे जो यथार्थ ।।
धन्य तो समर्थ । ज्ञानी एक ।।७।।
अनन्य भावानें । मज जे शरण ।।
त्यांनाच हे ज्ञान । देतसें मी ।।८।।
Chapter 10 – The Divine Grace
As bark and roots । Leaves, flowers, fruits ।
Are all elements । Of the same tress ।।5।।
The same way feelings । Wrong and right ।
Good-bad things । Spring out of me ।।6।।
Able those are । Who know on a par ।
That all these are । Mine embodiments ।।7।।
Those who completely । Surrender submissively ।
In their hands only । I Bestow the knowledge ।।8।।
(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)
……..
श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ दशमोऽध्यायः । विभूतियोगः
श्रीभगवानुवाच ।
बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ १०-४॥
अहिंसा समता तुष्टिस्तपो दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ १०-५॥
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा ।
मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ १०-६॥
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।
सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ १०-७॥
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ १०-८॥
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ १०-९॥
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०-१०॥
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ १०-११॥
(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

झोपाळ्यावरची गीता
झोंपाळ्यावरची गीता
रचना : अनंततनय
संकलन : अनिकेत कोनकर
प्रकाशन : सत्त्वश्री प्रकाशन…

