रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (६ मार्च) करोनाचे नवे ४२ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार ९८ झाली आहे. आज ११ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे ९ बाधित आढळले, तर १३ जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे ४२ रुग्ण आढळले. सर्वाधिक १४ रुग्ण खेड तालुक्यात आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ५, खेडमध्ये १४, गुहागर, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी २, चिपळूणमध्ये १२, तर राजापूर तालुक्यात एक रुग्ण आढळला. रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार गुहागरमध्ये १, तर संगमेश्वर तालुक्यात ३ बाधित आढळले. (दोन्ही मिळून ४२). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ९८ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ५५२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८३ हजार ५९९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३९ आहे. त्यातील सर्वाधिक ५० रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ५० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ११ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९५४१ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.४८ टक्के आहे.
जिल्ह्यात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६७ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६३ टक्के आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती
सिंधुदुर्गात आज (६ मार्च) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ९ करोनाबाधित आढळले, तर १३ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६४९९ झाली आहे. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ६१५१ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७४ आहे.
Follow Kokan Media on Social Media

