रत्नागिरीत १२, सिंधुदुर्गात करोनाचे नवे २३ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ मार्च) करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दहा हजार १९४ झाली आहे. आज ९ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात २३ नवे रुग्ण आज नोंदविले गेले. एका रुग्णाचा मृत्यू झाला.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरीतील स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी, दापोली, खेड आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी २, चिपळूण तालुक्यात ४, तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत खेड तालुक्यात १ रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून १३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार १९४ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ५६८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८७ हजार ४४८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १५६ आहे. त्यातील सर्वाधिक ५४ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ६१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ९ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९६४४ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.६० टक्के आहे.

जिल्ह्यात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या आता ३७० असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६३ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१२ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत ९ आणि आजपर्यंत एकूण ६ हजार २२० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २३ व्यक्ती बाधित झाल्याचा तपासणी अहवाल आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. आज २३ रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६ हजार ५७८ झाली आहे. कुपवडे (ता. कुडाळ) येथील २६ वर्षीय महिलेचा आज करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७७ आहे.

सावंतवाडीत कंटेन्मेंट झोन
दरम्यान, सावंतवाडीतील बाहेरचावाडा येथील यशोधन इमारत येथे येत्या २२ मार्चपर्यंत, तर सालईवाडा, सर्वोदयनदर वॉर्ड एफ, वृंदावन अपार्टमेंट येथे १९ मार्चपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply