रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज ५४ करोनाबाधितांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. आज रत्नागिरीत ११, तर सिंधुदुर्गात १५ नवे रुग्ण आढळले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार दापोलीत एक नवा रुग्ण आढळला. रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी ५, दापोली ३, खेड आणि गुहागर प्रत्येकी १ (दोन्ही मिळून एकूण ११) जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार २५२ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४०६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८९ हजार १९५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ११६ आहे. त्यातील सर्वाधिक ४५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ४६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ५४ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९७४७ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.०७ टक्के आहे.
जिल्ह्यातील मृतांची संख्या ३७० असून मृत्युदर ३.६१ टक्के आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज (१६ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज ९ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार २६१ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६ हजार ६१६ एवढी झाली आहे. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १७७ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
Follow Kokan Media on Social Media

