खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..
झोंपाळ्यावरची गीता – अध्याय बारावा : भक्तियोग
स्थिर ज्याचें मन । आणि समाधानी ।।
सदैव जो ध्यानीं । रमे माझे ।।१७।।
तनु-मन-धन । मज जो अर्पितो ।।
भक्त आवडतो । तोची मातें ।।१८।।
रागलोभांना जो । झालासे पारखा ।।
धन्य भक्तसखा । तोची माझा ।।१९।।
सबाह्य अंतरीं । सदा जो निर्मळ ।।
जणूं गंगाजळ । पवित्र तें ।।२०।।
Chapter 12 – Devotion
Of tranquil mind । As well satisfied ।
Always occupied । Yearningly to me ।।17।।
That who surrenders । With all possessions ।
Certainly becomes । My favourite ।।18।।
Who has lost । Anger and lust ।
Becomes inmost । Friend of mine ।।19।।
Entirely pure । Out and interior ।
Just as water । Of the Ganges ।।20।।
(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)
……..
श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ द्वादशोऽध्यायः । भक्तियोगः
श्रीभगवानुवाच ।
सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१४॥
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १२-१५॥
अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १२-१६॥
(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

झोपाळ्यावरची गीता
झोंपाळ्यावरची गीता
रचना : अनंततनय (दत्तात्रेय अनंत आपटे)
संकलन : अनिकेत कोनकर
प्रकाशन : सत्त्वश्री प्रकाशन

