रत्नागिरी, सिंधुदुर्गातील करोनाबाधितांची संख्या वाढतीच

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३१ मार्च) सलग सातव्या दिवशी नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. आज नवे ८७ रुग्ण आढळले, तर केवळ ३० रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज नवे ८४ रुग्ण आढळले, तर २६ जण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ४, दापोली १०, खेड १३, गुहागर २ आणि चिपळूण १४ (एकूण ४३). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ९, दापोली ६, गुहागर आणि लांजा प्रत्येकी २, चिपळूण १८, संगमेश्वर ६, राजापूर १ (एकूण ४४). (दोन्ही मिळून ८७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार २९ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ८६२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख २८६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४६० आहे. त्यातील सर्वाधिक ९० रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून २७२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ३० जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या दहा हजार १०५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज आणखी घटला असून तो ९१.६२ टक्के झाला आहे.

आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची संख्या ३७६ असून मृत्युदर ३.४१ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३१ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत २६, तर एकूण ६ हजार ४९९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात सध्या ४३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ८४ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७१२२ झाली आहे. मणचे (ता. देवगड) येथील ८० वर्षांच्या पुरुष रुग्णाचा मृत्यू आज झाला. त्यांच्यासह आतापर्यंत जिल्ह्यात १८३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply