खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..
झोंपाळ्यावरची गीता – अध्याय तेरावा : क्षेत्रक्षेत्रज्ञयोग
क्षेत्र शरीराची । माहिती बा जया ।।
आत्मसुख तया । मात्र एका ।।९।।
अन्नाची महती । काय जी लौकिकीं ।।
तीच ब्रह्माची कीं । परमार्थीं ।।१०।।
अन्न परब्रह्म । प्राण अन्नमय ।।
अन्न प्राणमय । कळे ज्या हें ।।११।।
कळलें हें जया । क्षेत्रज्ञाता तोची ।।
होतसे प्रपंचीं । धन्य धन्य ।।१२।।
Chapter 13 – Field and Functionary
Person who knows । The bodily course ।
Enjoys of course । Self rejoicing ।।9।।
For physical world । Food is significant ।
Brahma is important । For the long of truth ।।10।।
Food is sacred । Food is breath ।
Breath within food । Is indeed ।।11।।
He knows well । Body and soul ।
Knowledge identifies । The supreme soul ।।12।।
(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)
……..
श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ त्रयोदशोऽध्यायः । क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग:
श्रीभगवानुवाच
(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

झोपाळ्यावरची गीता
झोंपाळ्यावरची गीता
रचना : अनंततनय
संकलन : अनिकेत कोनकर
प्रकाशन : सत्त्वश्री प्रकाशन…

