झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय तेरावा – भाग ६

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय तेरावा : क्षेत्रक्षेत्रज्ञयोग

शेत-शेतशक्ति । प्रकृतिपुरुषा ।।
जाणे त्या पुरुषा । जन्म नाहीं ।।२१।।

शेत शेतकरी । यांचा योग खरा ।।
घरा गुरांढोरां । कारण तो ।।२२।।

आत्मा नी प्रकृति । यांचा जो संगम ।।
स्थावर जंगम । घडवी तो ।।२३।।

विनाशी सृष्टींत । ईश अविनाशी ।।
जाणे जो हें त्याशीं । ब्रह्म लाभे ।।२४।।

सर्वत्र सारखा । ईश भरला हें ।।
जाणे तोची लाहे । दिव्य पद ।।२५।।

Chapter 13 – Field and Functionary

The person who knows । Field and competence ।
He surely attains । Freedom from birth ।।21।।

Proper is the meeting । Of farmer and steading ।
That causes prospering । House and stock ।।22।।

Similarly unite । Body and spirit ।
Creatively generate । Belongings ।।23।।

Within the mortal । Gods stands imperishable ।
Knows only the able । Attains Brahma ।।24।।

God has occupied । The space instead ।
The knower gets indeed । Divine state ।।25।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ त्रयोदशोऽध्यायः । क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग:

श्रीभगवानुवाच

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply