रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (४ एप्रिल) नवे ६० रुग्ण आढळले. आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रुग्ण आढळले असून सर्वाधिक २८ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात आढळले आहेत. आज १०३ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज तिघांच्या मृत्यूची नोंद झाली.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १९, चिपळूण २, राजापूर ६ (एकूण २७). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ९, दापोली ५, खेड आणि गुहागर प्रत्येकी २, चिपळूण ७, संगमेश्वर ६, लांजा आणि मंडणगड प्रत्येकी १ (एकूण ३३) बाधित आढळले. (दोन्ही मिळून ६०). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार ४३८ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी १९४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख एक हजार दोन हजार २२६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५४८ आहे. त्यातील सर्वाधिक १२१ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून २८८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १०३ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या दहा हजार ३५६ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज काहीसा वाढला असून तो ९०.५४ टक्के झाला आहे.
जिल्ह्यात आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ३७८ असून मृत्युदर ३.३० टक्के आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कालपर्यंत ६६ हजार ७२ जणांचे करोनाप्रतिबंधक लसीकरण झाले आहे. त्यामध्ये ४५ वर्षांवरील ३३ हजार ५९३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १२ हजार ९ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण ९४ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (४ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ८८ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ७४०५ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ६३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज ३०, तर एकूण ६५७३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज जिल्ह्यात तिघा पुरुष रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. कुडाळमधील ७५ वर्षाच्या, न्हावेली (ता. सावंतवाडी) येथील ६३ वर्षाच्या आणि शिरगाव (ता. देवगड) येथील ७४ वर्षीय रुग्णाचा मृतांमध्ये समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १८८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
