रत्नागिरी जिल्ह्यात ११६, सिंधुदुर्गात नवे ६७ करोनाबाधित, तिघांचा मृत्यू

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३ एप्रिल) सलग दहाव्या दिवशीही नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज नवे ११६ रुग्ण आढळले. सिंधुदुर्गात ६७ रुग्ण आढळले. दोन्ही जिल्ह्यांत मिळून तिघांचा मृत्यू आज नोंदविला गेला.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज मंडणगड वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये रुग्ण आढळले असून सर्वाधिक ३२ रुग्ण रत्नागिरी तालुक्यात आढळले आहेत. आज ४९ रुग्ण करोनामुक्त झाले, तर एकाचा मृत्यू झाला.

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी २२, खेड ६, गुहागर ८, चिपळूण १४, संगमेश्वर २७, लांजा ८, राजापूर प्रत्येकी १२ (एकूण ९७). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १०, दापोली १, चिपळूण ७, लांजा १ (एकूण १९) बाधित आढळले. (दोन्ही मिळून ११६). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ११ हजार ३७८ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ६६८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख एक हजार दोन हजार ३२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५४९ आहे. त्यातील सर्वाधिक १०६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ३०९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ४९ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या दहा हजार २५३ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आजही आणखी घटला असून तो ९०.११ टक्के झाला आहे.

खेड येथील ७७ वर्षीय पुरुष रुग्णाचा काल शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्याची नोंद आज झाल्यानं जिल्ह्यातील मृतांची संख्या ३७८ झाली असून मृत्युदर ३.३२ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आज (३ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार ६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ७ हजार ३१७ एवढी झाली आहे. आज १७ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार ५४३ झाली आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची वाढू लागली असून ती ५८३ झाली आहे. करोनामुळे आज दोघा पुरुष रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी एक नेहरूनगर (कणकवली) येथील ६२ वर्षीय, तर दुसरा वरवडे (ता. कणकवली) येथील ७२ वर्षीय पुरुष आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १८५ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply