रत्नागिरी जिल्ह्यात नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ मे) करोनाचे नवे २५९ रुग्ण आढळले. आज ३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक होती.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ८४, दापोली १०, चिपळूण २७, संगमेश्वर २०, मंडणगड १४, लांजा ३६ आणि राजापूर ११ (एकूण २०५). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १, दापोली १, गुहागर २, चिपळूण ३. (एकूण ७). (दोन्ही मिळून २०९). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण ५०. (सर्व मिळून २५९).

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३० हजार ५९५ झाली आहे.

आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ५७६ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ६९३ जणांची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ४७ हजार ९७१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ३४० रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २५ हजार ९० झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८२.०० टक्के आहे.

जिल्ह्यात आज पूर्वीचे ७ आणि आजचे ७ अशा १४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आजच्या ७ पैकी चौघांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत, तर तिघांचा खासगी रुग्णालयात झाला आहे. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ९२९ झाली असून मृत्युदर ३.०३ टक्के आहे.

तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २६०, खेड १०३, गुहागर ४०, दापोली ८०, चिपळूण १८४, संगमेश्वर १३२, लांजा ५४, राजापूर ६६, मंडणगड १०. (एकूण ९२९).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply