रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० मे) करोनाचे नवे ३३९ रुग्ण आढळले, तर ६१० रुग्ण बरे होऊन घरी गेले. आज सलग चौथ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक होती. हे चित्र दिलासादायक असले, तर मृतांचे प्रमाण मात्र आज वाढले आहे.
जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १११, दापोली ४, चिपळूण २८, संगमेश्वर ४, लांजा २ आणि राजापूर २० (एकूण १६९). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरीत एकमेव रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून १७०). कालच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण १६९. (सर्व मिळून ३३९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३१ हजार ६२२ झाली आहे.
आज विविध ठिकाणी आणि होम आयसोलेशन मिळून चार हजार ९७ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. आज आणखी एक हजार ३५३ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ५१ हजार ५०१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
जिल्ह्यात आज ६१० रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या २६ हजार ५३३ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ८३.९० टक्के आहे.
जिल्ह्यात आज पूर्वीचे २० आणि आजचे १२ अशा ३२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ९९२ झाली असून मृत्युदर ३.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
तालुकानिहाय आतापर्यंतच्या मृतांची संख्या अशी – रत्नागिरी २८३, खेड १११, गुहागर ४३, दापोली ९४, चिपळूण १८९, संगमेश्वर १३५, लांजा ५५, राजापूर ७१, मंडणगड ११. (एकूण ९९२).
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
