रत्नागिरी : जिल्ह्यात आज (दि. २४ नोव्हेंबर) करोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा किंचित वाढ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही काहीशी वाढली आहे.
आज १२ नवे रुग्ण आढळले, तर ८ जण करोनामुक्त होऊन घरी गेले. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४१ आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी करोनाविषयक अहवालात ही माहिती दिली आहे.
आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे १२ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ६१ झाली आहे. आज ८ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५३६ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८१ आहे.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५७२ पैकी ५६८, तर रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ६७४ पैकी ६६६ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. अनुक्रमे ४ आणि ८ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख २९ हजार ८०८ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज जिल्ह्यात ४१ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात लक्षणे नसलेले २६, तर लक्षणे असलेले १५ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या २६ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात १५ जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ७, तर डीसीएचमध्ये ८ रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ७ जण ऑक्सिजनवर, २ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गेल्या आठवड्यातील मृत्युदर २.७८ टक्के होता. या आठवड्यात तो ३.१४ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४८४ एवढीच आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२१, खेड २२८, गुहागर १७३, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२७, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४८४).
लसीकरणाची स्थिती
जिल्ह्यात २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या लसीकरण सत्रांत २०७८ जणांनी करोनाप्रतिबंधक लशीचा पहिला, तर ५४३१ जणांनी दुसरा डोस घेतला. २२ नोव्हेंबरपर्यंतच्या एकूण स्थितीनुसार, जिल्ह्यातील ९ लाख ३९ हजार ९८८ जणांनी पहिला, तर ४ लाख २७ हजार ९१४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण १३ लाख ६७ हजार ९०२ जणांचे लसीकरण झाले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media