रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या २०० च्या वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ५ जानेवारी) करोनाचे नवे ८२ रुग्ण आढळले, तर ८ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय करोनाबाधितांची संख्या २३१ झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार ३९४ झाली आहे, तर आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ६७१ आहे. करोनामुक्तांची टक्केवारी आणखी घटून ९६.५७ झाली आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ४२९ पैकी ४०३ निगेटिव्ह, तर २६ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या ७१० पैकी ६५४ नमुने निगेटिव्ह, ५६ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ६५ हजार ४९७ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या २३१ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १७१, तर लक्षणे असलेले ५० रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १७१, तर संस्थात्मक विलगीकरणात ५० जण आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये ३४, तर डीसीएचमध्ये २० रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. अतिदक्षता विभागात एक रुग्ण दाखल आहे.

आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २४९२ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.१ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७४, चिपळूण ४८०, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८३०, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४९१).

लसीकरणाचा वेग वाढला

जिल्ह्यात करोनाप्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार काल (दि. ४ जानेवारी) झालेल्या करोनाप्रतिबंधक लसीकरण सत्रांत १,६२८ जणांनी पहिला, तर १०,००३ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण ११ हजार ६३१ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील १० लाख १५ हजार ४२३ जणांचा पहिला, तर ७ लाख १४ जणांचे दोन्ही डोसेस घेऊन झाले आहेत. एकूण १७ लाख १५ हजार ४३७ जणांचे लसीकरण जिल्ह्यात पार पडले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply