देवरूख येथे १२, १३ मार्चला जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

देवरूख : येथील सत्यनारायण प्रासादिक बाल मित्र मंडळातर्फे येत्या १२ आणि १३ मार्च रोजी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत नाव नोंदवताना १८ वर्षांवरील सर्व खेळाडूंना करोनाप्रतिबंधक दोन्ही डोस घेतल्याच्या प्रमाणपत्राचीच झोरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे. स्पर्धा पुरुष एकेरी, महीला एकेरी, पुरुष दुहेरी, कुमार गट एकेरी, कुमारी गट एकेरी, किशोर गट एकेरी, किशोरी गट एकेरी आणि वयस्क पुरुष एकेरी अशा ८ गटांत खेळविली जाणार आहे. स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन (राष्ट्रीय संघटना) आणि आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार खेळविली जाईल. या क्रीडा वर्षातील ही दुसरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा असल्याने खेळाडूंनी २०२१९-२२ या वर्षाची ५० रुपये रजिस्ट्रेशन फी जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी एकेरी गटासाठी प्रत्येकी १०० रुपये, पुरुष दुहेरी प्रत्येकी २०० रुपये राहील. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका आल्या नाहीत, तर त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल. इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका गुरुवार, १० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच स्पर्धा शुल्कासह सादर कराव्यात. स्पर्धेत सामना खेळताना पांढऱ्या रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे.

स्पर्धेच्या प्रवेशिका आणि शुल्क देण्यासाठी खालील प्रतिनिधींशी संपर्क साधावा. : १) गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), २) चिपळूण – साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), ३) देवरूख – मोहन हजारे (२४२२०५३९४३), ४) रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), ५) संगमेश्वर – मनमोहन बेंडके (९१३०३०६५२५), ६) दापोली – अनय टकले (९४०५९५३७८६), ७) खेड -योगेश आपटे (०९९५३२२२६३९).

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून कॅरम नॅशनल पंच साईप्रकाश कानिटकर आणि राज्यस्तरीय पंच योगेश आपटे यांची निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई आणि सत्यनारायण प्रासादिक बाल मित्रमंडळाने केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply