
मी अभिजित दिलीप जाधव. अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. परंतु सध्याच्या युगात विजेची गरज लक्षात घेता सोलर क्षेत्रातून व्यवसायाची सुरुवात केली.
मी विद्युत अभियांत्रिकी पदविका आणि कला शाखेची पदवीही घेतली आहे. पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमात विद्यापीठात मी प्रथम क्रमांक मिळविला आहे. याशिवाय मानवाधिकार शिक्षणही घेतले आहे.
मी माझ्या व्यवसायाची सुरुवात 2014 साली फुटपाथवर फुलांच्या स्टॉलपासून केली. नंतर 2016 मध्ये डी. लाइट डिस्ट्रिब्यूटर, बजाज इलेक्ट्रिकल्स सर्व्हिस सेंटर (2020), उषा इंटरनॅशनल डिस्ट्रिब्यूटर, व्हीनस होम अप्लायन्सेस सर्व्हिस पार्टनर, मितवा सोलर डिस्ट्रिब्यूटर (2021), कॅन्डेस होम अप्लायन्सेस डिस्ट्रिब्यूटर (2022) अशी माझी व्यवसायाची प्रगती आहे.
स्थलांतरित कामगार, शासकीय योजनांतर्गत लावण्यात येणारे सौरदिवे, राधानगरी, चांदोली अभयारण्यात लागणारे सौरदिवे ही कामे मी प्रामुख्याने केली आहेत. कालांतराने सेवा क्षेत्रातील महत्त्व लक्षात घेऊन बजाज इलेक्ट्रिकल्स, व्हीनस होम अप्लायन्सेस या कंपन्यांचे अधिकृत सर्व्हिस सेंटर 2019 पासून चालू केले आहे. करोना कालखंडात या अत्यावश्यक उद्योगामुळे माझा व्यवसाय स्थिरस्थावर आहे.
जुलै 2021 साली उषा इन्टरनॅशनल कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशिप घेऊन पुन्हा एक नवीन काम चालू केले आहे. सोबतच कॅन्डेस कंपनीच्या स्टॅबिलायझर विभागाची डिस्ट्रिब्यूटरशिप नुकतीच चालू केली आहे. विजेच्या क्षेत्रातील हमखास नाव म्हणून आमच्या जाधव एन्टरप्रायझेसचे नाव आपल्या नोंदवहीत अवश्य नोंदवून ठेवावे.
कार्यालय : ए-10, आदिनाथ पॅराडाइज,
मजगाव रोड, गोडबोले स्टॉप, रत्नागिरी-415639
ईमेल : jadhaventerprises15@gmail.com
संपर्क क्रमांक : 070 58185 666, (02352) 295529
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड