रत्नागिरी : श्री गणेशोत्सवानिमित्त ओम साई मित्र मंडळ आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा ओम साई सांस्कृतिक भवन, साळवी स्टॉप, नाचणे रोड येथे १ आणि २ सप्टेंबर रोजी होणार आहेत.
स्पर्धेत ब्रेक टू फिनिश व ब्लॅक टू फिनिश नोंदविणार्या खेळाडूंना प्रथम फेरीपासून खास रोख पारितोषिके देण्यात येतील.
स्पर्धा पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी आणि कुमार गट अशा ४ गटांत होणार आहे. स्पर्धा अखिल भारतीय कॅरम फेडरेशन (राष्ट्रीय संघटना) आणि आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनच्या प्रचलित स्पर्धा नियमावलीनुसार खेळविली जाईल. या क्रीडा वर्षातील ही ही दुसरी जिल्हा मानांकन स्पर्धा असल्याने खेळाडूंनी २०२२-२३ या वर्षाची ५० रुपये रजिस्ट्रेशन फी जिल्हा असोसिएशनकडे जमा करावी. स्पर्धेसाठी प्रवेश फी एकेरी गटासाठी प्रत्येकी १५० रुपये, पुरुष दुहेरी प्रत्येकी ३०० रुपये राहील. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येईल.
इच्छुक सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २८ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच स्पर्धा शुल्कासहित
खालील ठिकाणी द्यावयाच्या आहेत. त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही. स्पर्धेत सामना खेळणासाठी पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट खेळाडूने परिधान करणे आवश्यक आहे.
प्रवेशिका सादर करण्यासाठी प्रतिनिधी – १) गुहागर – प्रदीप परचुरे (९४२३०४८२५०), २) चिपळूण – साईप्रकाश कानिटकर (९४०३५६४७८२), ३) देवरूख – मोहन हजारे (९४२२०५३९४३), ४) रत्नागिरी – विनायक जोशी (८३९०३८७४८३), ५) संगमेश्वर — मनमोहन बेंडके (९९३०३०६५२५), ६) खेड – योगेश आपटे (०९९५३२२२६३१).
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राज्यस्तरीय पंच सागर कुलकर्णी आणि विनायक जोशी यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेण्याचे आवाहन अनंत आगाशे (अध्यक्ष, ओम साई मित्र मंडळ), पराग सावंत (खजिनदार, ओम साई मित्र मंडळ), प्रवीण नांदगावकर (सेक्रेटरी, ओम साई मित्र मंडळ), प्रदीप भाटकर (अध्यक्ष,
रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), सुरेंद्र देसाई (उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), सुचय रेडीज (सल्लागार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन), मिलिंद साप्ते (सचिव, जिल्हा कॅरम असोसिएशन) यांनी केले आहे.

