रत्नागिरीच्या ‘टेक्नोव्हेव 2k24’ स्पर्धेवर कुडाळचे वर्चस्व

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या आय. टी. विभागाने आयोजित केलेल्या ‘टेक्नोव्हेव 2k24’ महाविद्यालयीन स्पर्धेत चारपैकी तीन प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून कुडाळच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, वेब डेव्हलपमेंट, कोड बॅटल आणि विडमास्टर अशा चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. गोवा, कुडाळ, कणकवली, देवरूख, रत्नागिरी, चिपळूण अशा ठिकाणांहून १० महाविद्यालयांमधील ६९ विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला.

स्पर्धेचा गुणानुक्रमे निकाल असा – पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन : सलोनी बामणे (डीबीजे कॉलेज, चिपळूण), सर्वेश खानविलकर (आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज, देवरूख), ख़ुशी भुर्के (गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी).

वेब डेव्हलपमेंट : अन्सेल बोथेलो (संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ), गौरव भुरवणे (आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज, देवरूख), स्कुबर्ट अफोन्सो (रोझरी कॉलेज, गोवा).

कोड बॅटल : प्रथम परब (संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ), अल्वर फुर्टाडो (रोझरी कॉलेज, गोवा), लेनोन रॉड्रिग्ज (रोझरी कॉलेज, गोवा).
विड मास्टर : अजिंक्य लाने (संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ), प्रथमेश अनिल पाटकर (आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज, देवरूख), रोहित जोयशी (एस. पी. हेगशेट्ये कॉलेज, रत्नागिरी).

यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. सर्व स्पर्धांची प्रथम पारितोषिके रत्नागिरीच्या आर्यक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्रायोजित केली होती. पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेसाठी रवींद्र केरकर (फिनोलेक्स कॉलेज), तर वेब डेव्हलपमेंट आणि विडमास्टर स्पर्धेसाठी अमित पालकर (बारटक्के, रत्नागिरी) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. मेधा सहस्रबुद्धे, आयटी को-ऑर्डिनेटर डॉ. विवेक भिडे, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply