रत्नागिरीच्या अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी आरोग्य सुविधा सुरू

रत्नागिरी : रत्नागिरीतील अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू झाले असून रत्नागिरीकरांना परवडणारी अद्ययावत आरोग्य सुविधा देण्यासाठी हॉस्पिटल कटिबद्ध आहे, अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सुशीलकुमार मुळ्ये व डॉ. मीरा मुळ्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धन्वंतरी हॉस्पिटल (संगमेश्वर) आणि दीनदयाळ हॉस्पिटल (लांजा) येथील यशस्वी व्यवस्थापनानंतर रत्नागिरीत अॅ पेक्स हॉस्पिटल रत्नागिरीत सुरू झाले. देशसेवा आणि समाजसेवेकरिताच पहिली दोन रुग्णालये सेवा बजावत आहेत. रत्नागिरीत सुरू झालेल्या रुग्णालयात कोविडच्या ६०० रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यानंतरचा टप्पा म्हणून तेथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू झाले आहे. पारदर्शक कारभार आणि रुग्णांना शासनाच्या योजनांचा लाभ दिला जाईल. तसेच आरोग्य विमाधारकांना कॅशलेस सुविधा पुरविली जाईल, अशी माहिती डॉ. मुळ्ये उभयतांनी दिली. डॉ. मुळ्ये म्हणाले की, आता रत्नागिरीतील रुग्णांना उपचारांसाठी कोल्हापूर, पुण्यात जाण्याची वेळ येणार नाही. येथे प्रशिक्षित नर्स, वॉर्डबॉय आहेत. रुग्णालयाचा कारभार पूर्ण पारदर्शकतेनेच केला जाणार आहे.

डॉ. मुळ्ये म्हणाले, अॅ पेक्समध्ये २४ तज्ज्ञ डॉक्टर्स वेळोवेळी गरजेनुसार उपलब्ध असतील. लो रेडिएशन कॅथलॅब, सीटी स्कॅन, स्ट्रेस टेस्ट, 3 सुसज्ज ऑपरेशन थिएटर, डायलेसिस युनिट आगेत. ऑर्थोपेडिक, स्त्री रोग, मधुमेह, हृदयाचे विकार, मेंदूचे आजार, पोटाचे आजार, शस्त्रक्रिया, मूत्रमार्गविकार, किडनीचे विकार, कॅन्सर यावर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. रुग्णालयात दोन एक्झिक्युटिव्ह रूम असून तेथे टब बाथ, पंचतारांकित सेवा मिळेल. प्रामुख्याने राजकीय नेते, उद्योगपतींसाठी या रूम्स आहेत. जनरल ३०, आयसीयू १२, एनआयसीयू २, आयसोलेशन वॉर्ड ५ अशा ७५ बेडची सुविधा अॅसपेक्स रुग्णालयात उपलब्ध आहे.

कोल्हापूर येथील अथायु हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने सुपरस्पेशालिटी बाह्य रुग्ण विभाग दुपारी १२ ते २ या वेळेत सुरू करण्यात येत आहे. अॅपेक्समध्ये दुसऱ्या आणि चौथ्या गुरुवारी हृदयविकातज्ज्ञ डॉ. श्रीकांत माने, डॉ. सिद्धनगौडा, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. राहुल पाटील येतील. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. बसवराव कडलगे व लॅप्रोस्कोपिक जनरल सर्जन डॉ. सौरभ गांधी, मेंदू व मणकाविकार तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध मोहिते येणार आहेत.

पत्रकार परिषदेला डॉ. सौ. मीरा मुळ्ये, डॉ. सलमा शेकासन, डॉ रवींद्र गोडे, सौ. तेजा मुळ्ये, अथायू हॉस्पिटलचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड मदन गोरे उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply