रत्नागिरीत ७, तर सिंधुदुर्गात २१ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१७ जानेवारी) करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले, तर दोघे करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २१ नवे रुग्ण आढळले, तर १२ रुग्ण करोनामुक्त झाले. दोन्ही जिल्ह्यांत मृत्यूची नोंद आज झालेली नाही.

रत्नागिरीतील स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ३, रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार दापोली आणि लांजा तालुक्यात प्रत्येकी १, तर खेड तालुक्यात २ बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून एकूण ७). एकूण रुग्णांची संख्या आता ९३९५ झाली आहे. आज आणखी १६६ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६३ हजार ८०८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९४ आहे. त्यातील सर्वाधिक ३६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत.

जिल्ह्यात आज दोघे जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या ८९३५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.१० टक्के झाला आहे. आज नव्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची संख्या ३३९ एवढीच असून मृत्युदर ३.६१ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात आज दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, आज २१ नवे करोनाबाधित आढळले, तर १२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६०७३ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५६८८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६४ एवढीच आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply