खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..
झोंपाळ्यावरची गीता – अध्याय तिसरा – कर्मयोग
स्वभावधर्म तो । युद्ध असे तूझा ।।
करशील राजा । आपोआप ।।२४।।
तयापुढें काय । निश्चयाचा पाड ।।
ऊठ, अंग झाड । लाग युद्धा ।।२५।।
इंद्रियविषय । द्वेष भक्ति नांवें ।।
बळी न पडावें । त्यांना कधीं ।।२६।।
विगुण स्वधर्म । तरि तोचि चांग ।।
अन्यधर्म चांग । तरी वर्ज्य ।।२७।।
स्वधर्मी मरण । तरी श्रेयस्कर ।।
परी हानिकर । अन्य धर्म ।।२८।।
Chapter 3 – Action and function
Battling is your । Ingenital nature ।
Obviously sure । You shall perform ।।24।।
Determination doesn’t । At all withstand ।
Wake up, stretch and । Start battling ।।25।।
Hate, love and anger । All bodily matter ।
Not to surrender । Before them ।।26।।
The ingenital nature । Is always better ।
Although characters other । Seem to be good ।।27।।
Dying for the quest । Of own nature is the best ।
And for all the rest । Brings loss ।।28।।
(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)
……..
श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ तृतीयोऽध्यायः । कर्मयोगः
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥३-३२॥
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥३-३३॥
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥३-३४॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥३-३५॥
(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

झोपाळ्यावरची गीता
झोंपाळ्यावरची गीता
रचना : अनंततनय
संकलन : अनिकेत कोनकर
प्रकाशन : सत्त्वश्री प्रकाशन…

