रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३० जानेवारी) करोनाचे नवे ७ रुग्ण आढळले, तर १९ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ नवे रुग्ण आढळले, तर १३ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एका मृत्यूची नोंद झाली.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार, रत्नागिरी व चिपळूण तालुक्यात प्रत्येकी दोन, खेड, संगमेश्वर आणि मंडणगड तालुक्यात प्रत्येकी एक असे ७ नवे बाधित रुग्ण सापडले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९५४७ झाली आहे. आज आणखी ५७५ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली; मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७१ हजार ८६५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १०१ झाली आहे. त्यातील सर्वाधिक ३० रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ४८ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
जिल्ह्यात आज १९ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९०८४ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.१५ टक्के झाला आहे. मृतांची एकूण संख्या ३४८ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६४ टक्के आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गात आज (३० जानेवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, १२ नवे करोनाबाधित आढळले, तर १३ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६२३९ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५८५० झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कणकवली येथील ७३ वर्षीय पुरुषाचा आज करोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६६ झाली आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
