रत्नागिरी तालुक्यात शिवसेना पुरस्कृत सरपंचांची संख्या अकराने घटली

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात काल आणि आज (ता. ९ आणि १० फेब्रुवारी) झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत सरपंचांच्या संख्येत गेल्या वेळेपेक्षा ११ जागांनी घट झाली आहे. तालुक्यातील ५३ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर गेल्या वेळी शिवसेना पुरस्कृत सरपंच निवडून आले होते. यावेळी ४० ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे, ८ ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच निवडून आले आहेत. पाच ग्रामपंचायती गाव पॅनलने जिंकल्या आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील सरपंचपदाची निवड प्रकिया दोन दिवस चालली. ज्या गावांमध्ये शिवसेनेला पूर्ण बहुमत आहे, तेथील सरपंचांची नावे शिवसेनेने जाहीर केली आहेत.

तालुक्यातील ग्रामपंचायती आणि तेथे निवड झालेले सरपंच-उपसरपंच असे – नाखरे – सरपंच शुभदा सुभाष नार्वेकर, उपसरमपंच विजय शांताराम चव्हाण. नाचणे – सरपंच ऋषिकेश ऊर्फ भैया भोंगले, उपसरपंच वर्षा नाईक. (नाचणे ग्रामपंचायतीत पुढील अडीच वर्षे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग घोसाळे यांना सरपंचपद देण्याचे ठरले आहे.) ओरी – सरपंच आकांक्षा सुधीर देसाई, उपसरपंच संकेत देसाई, नेवरे – सरपंच दीपक फणसे, उपसरपंच कोमल बहिरे, गणपतीपुळे – सरपंच कल्पना पकले, उपसरपंच महेश केदारी, जांभरूण – सरपंच गौतम सावंत, खेडशी – सरपंच निरंजन ऊर्फ बाळा सुर्वे, उपसरपंच मानसी पेडणेकर, पावस – सरपंच आरोही गुरव, उपसरपंच रवींद्र रमाकांत शिंदे, गावखडी – सरपंच मुरलीधर भिकाजी तोडणकर, उपसरपंच स्मिता भिवंदे, कोतवडे – सरपंच तुफिल पटेल, उपसरपंच संतोष बारगुडे, मजगाव – फैयाज फकीर महंमद मुकादम, आरजू मेहबूब मुकादम. मिरजोळे- संदीप नाचणकर, राहुल पवार, शिवार आंबेरे – राजन रोकडे, नंदकुमार मोर्ये, पाली- सरपंचपद रिक्त, उपसरपंच संतोष धावडे, गोळप – मिताली भाटकर, जिगरमियाँ पावसकर, कासारी- दर्शना बेनेरे, संदेश महाकाळ, हातखंबा- जितेंद्र तारवे, सुनील डांगे, सैतवडे- सागर कदम, फरजाना पटेल, वरवडे- विराग पावसकर, गजानन हेदवकर, वाटद- अंजली विभूते, सुप्रिया नलावडे, चवे – दीपक गावणकर, रेखा यादव, नांदिवडे- आर्या गडदे, विवेक सुर्वे, नाणीज – गौरव संसारे, राधिका शिंदे, चाफे – श्रद्धा गवळकर, अनिता कोकरे, सोमेश्वर – नाझिया मुकादम, उत्तम नागवेकर, आगरनरळ – अनुष्का खेडेकर, अशोक गोताड, मिऱ्या – आकांक्षा कीर, उषा कांबळे, नेवरे – दीपक बावकर, चंद्रकांत कांबळे, उक्षी – किरण जाधव, मंगेश नागवेकर.

कोतवडे ग्रामपंचायतीत भाजप-शिवसेना युती झाल्याचे सांगितले जाते. याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी सांगितले की विरोधी भाजप गटातील ५ सदस्य आमच्या बरोबर आले. त्यांना शिवसेनेचा सरपंच मान्य झाला. त्या पाच जणांपैकी एकाला उपसरपंचपद दिले गेले. शिवसेनेचे तुफिल पटेल यांनी सरपंचपदासाठी अर्ज भरला. तो बिनविरोध झाला. उपसरपंच म्हणून संतोष बारगुडे यांची निवड झाली. दरम्यान, कोतवडे येथे युती झाली म्हणणे योग्य नाही. युतीसंदर्भात भाजपाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने घोषणा केलेली नाही, असे दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी स्पष्ट केले. नवनिर्वाचित सदस्यांनी सरपंचपदासंदर्भात काही भूमिका घेतली असेल, तर तो पक्षाचा निर्णय नाही. भाजपा शिवसेनेबरोबर जाणार नाही. तेथील घडामोडींचा अहवाल घेऊन पक्षाच्या तत्त्वप्रणालीविरुद्ध वर्तन झाले असल्यास कारवाई अटळ ठरेल, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेबरोबर युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या पक्षाची विचारधारा बदलली आहे, अशा विचारधारेसमवेत रत्नागिरीतील भाजपा जाण्याची शक्यता नाही.

काही ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा उमेदवार म्हणून शिवसेने उभे केलेले सदस्य निवडून आल्यावर पक्षाच्या आदेशानुसार न वागता परस्पर निर्णय घेऊन वेगळेच वागले असतील, तर अशा लोकांवर नक्कीच कारवाई करणार असल्याचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी सांगितले.

भाजपने काळबादेवी, कोतवडे, सडामिऱ्या, जाकीमिऱ्या, वाटद, नांदिवडे, राई, चाफेरी या ग्रामपंचायती घेतल्या. वाटद ही शिवसेनेची ग्रामपंचायत होती. तेथे शिवसेनेचे सदस्य निवडून आले होते. त्यांना सरपंचपद हवे होते. ते न मिळाल्याने त्यांनी भाजपला मदत केल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. शिवसेनेने भाजपकडून कोतवडे ग्रामपंचायत हिसकावून घेतली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply