रत्नागिरीत अकरा, सिंधुदुर्गात दहा नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी :रत्नागिरी जिल्ह्यात आज (१० फेब्रुवारी) करोनाचे नवे ११ रुग्ण आढळले, तर चौघे जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवे १० रुग्ण आढळले, तर ४ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत १, चिपळूणमध्ये ५, तर (एकूण ८), तर रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार, रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी १ नवे बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून ११). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९६६६ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी २३२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७४ हजार २९८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९५ आहे. त्यातील सर्वाधिक २७ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ३२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज चौघे जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९१९५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.१२ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या ३५२ असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६४ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (१० फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, १० नवे करोनाबाधित आढळले, तर ४ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३१९ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५९७१ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या १७० आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply