झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय सहावा – भाग ७

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय सहावा – आत्मसंयम

योगी योगभ्रष्ट । होतां कृष्णराया ।।
कोण गती तया । लाभतसे ?।।२४।।

मेघाचे बा खंड । मधेंच तुटोनी ।।
नाश ते निंदानीं । पावे जैसें ।।२५।।

तैसा योगभ्रष्ट । जातो काय नाशा ।।
सांग हे रमेशा ! दयासिंधो ।।२६।।

पर्जन्यावांचूनी । डोंगराची तृष्णा ।।
कोण हरी कृष्णा । यदुनाथा ।।२७।।

प्रवासी प्रवासीं । मुक्काम करीती ।।
म्हणूनी का येती । मागें पुन्हां ।।२८।।

Chapter 6 – Self Restraint

Krishna, tell me । If perverts a Yogi।
Which way does he । Go ahead? ।।24।।

A cloud in case । Fractures to peices ।
And then vanishes । In no time ।।25।।

Krishna, please say । If the same way ।
A soul led astray । Gets perished ।।26।।

Who comes then । Except the rain ।
To a dry mountain । To quench its thirst ।।27।।

Passing by a way । Travellers make stay ।
Tell me do they । Move backward? ।।28।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ षष्ठोऽध्यायः । आत्मसंयमयोगः

अर्जुन उवाच ।

अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥६-३७॥

कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥६-३८॥

एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥६-३९॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply