झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय नववा – भाग १

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय नववा : राजगुह्य

तापे फणालेल्या । खीर ओगरणें ।।
मृत्यूच्या लोटणें । खाईमध्यें ।।१।।

सत्त्वाढ्य भातुकें । पचेल त्या द्यावें ।।
सुपात्र तूं ठावें । म्हणूनीया ।।२।।

आज तुझ्यापुढें । मनींच्या मनींचे ।।
गूढ अंतरींचे । उकलतों ।।३।।

सर्वस्व हें माझें । स्वधाम धर्माचें ।।
मंदिर मोक्षाचें । उघडतों ।।४।।

Chapter 8 – The Divine Secret

Sweet however । Feeding in fever ।
Certainly closer । Bringing death ।।1।।

Nutritious diet । Easy to digest ।
Is only permitted । You know well ।।2।।

The secret inside । Deep in mind ।
Oh, Prince candid । Let me reveal ।।3।।

Very home of religion । Shrine of salvation ।
Am going to open । My entire essence ।।4।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ नवमोऽध्यायः । राजविद्याराजगुह्ययोगः

श्रीभगवानुवाच ।

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥९-१॥

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥९-२॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply