रत्नागिरीत १९, तर सिंधुदुर्गात १३ नवे करोनाबाधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२८ फेब्रुवारी) करोनाचे नवे १९ रुग्ण आढळले, तर २० जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे १३ बाधित आढळले, तर १० जण बरे होऊन घरी गेले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १९ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत १, दापोलीत ४, चिपळूणमध्ये ७, संगमेश्वरात ५, तर राजापुरात एक बाधित रुग्ण आढळला. (एकूण १८). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार दापोलीत १ रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून १९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९९७४ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४७६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ८० हजार ५९५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १३० आहे. त्यातील सर्वाधिक ४१ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत. ४४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज २० जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९४४५ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.७० टक्के आहे.

जिल्ह्यात आज एका मृत्यूची नोंद झाली. २७ फेब्रुवारीला संगमेश्वर तालुक्यातील ५८ वर्षांच्या पुरुष रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६५ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६६ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२८ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे १३ करोनाबाधित आढळले, तर १० रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६४४२ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६११४ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply