रत्नागिरीत करोनाची स्थिती गंभीर, नवे ४७ बाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० मार्च) करोनाची स्थिती गंभीर बनली आहे. आज नवे ४७ रुग्ण आढळले, तर केवळ ७ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ जणांना करोनाची बाधा झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी आणि चिपळूण प्रत्येकी ८, दापोली ३, खेड आणि संगमेश्वर प्रत्येकी ४, गुहागर आणि लांजा प्रत्येकी १ (एकूण २९). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १०, खेड, चिपळूण ५, संगमेश्वर आणि मंडणगड प्रत्येकी १ (एकूण १८). (दोन्ही मिळून ४७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ३६५ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ७११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ९१ हजार ५३६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १५३ आहे. त्यातील सर्वाधिक ४७ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ६५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ७ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या नऊ हजार ७९८ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.५२ टक्के आहे.

आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची संख्या ३७१ असून मृत्युदर ३.५८ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२० मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ५, तर एकूण ६ हजार ३०९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात सध्या १९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ६६९२ झाली आहे, तर आतापर्यंत जिल्ह्यात १७९ जणांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी ठरली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply