खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..
झोंपाळ्यावरची गीता – अध्याय तेरावा : क्षेत्रक्षेत्रज्ञयोग
म्हणोनी जें यांचें । ज्ञान तेंच ज्ञान ।।
येर तें अज्ञान । फुकटची ।।५।।
तैसें परमार्थीं । आत्मा शरीरांचें ।।
ज्ञान तेंच साचें । असें एक ।।६।।
जमीनीची ज्याला । माहिती नसेल ।।
कशी तो कशील । शेती तरी ।।७।।
शेताची माहिती । जयातें पुरती ।।
भोगी तो श्रीमंती । लौकिकांत ।।८।।
Chapter 13 – Field and Functionary
That is hence । The actual sense ।
The rest may sense । As useless ।।5।।
Vital similarly । The knowledge of only ।
The spirit and body । To know divine truth ।।6।।
How can one । Without information ।
Do plantation । In the field ।।7।।
Person acquainted । To farming activity ।
Would naturally gain । Prosperity ।।8।।
(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)
……..
श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ त्रयोदशोऽध्यायः । क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग:
श्रीभगवानुवाच
(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

झोपाळ्यावरची गीता
झोंपाळ्यावरची गीता
रचना : अनंततनय
संकलन : अनिकेत कोनकर
प्रकाशन : सत्त्वश्री प्रकाशन…

